मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने 2006 च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात 21 जुलै रोजी एक मोठा निकाल दिला आणि सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस.जी. चांडक यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील एकूण 12 आरोपींना यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यापैकी पाच जणांना मृत्युदंड आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान, 11 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर यातील एका आरोपीचा आधीच मृत्यू झाला आहे.

मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींना उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. उच्च न्यायालयाने म्हटले की, आरोपींविरुद्धचा खटला सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. घटनेला 19 वर्षे झाल्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. न्यायाधीश अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष न्यायपीठाने म्हटले की, सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी निर्णायक नाहीत. 11 जुलै 2006 रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय भागात सात गाड्यांमध्ये साखळी स्फोट झाले होते. त्यात 189 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 824 लोक जखमी झाले होते. हे स्फोट संध्याकाळी 6:24 ते 6:35 दरम्यान झाले. हा तो वेळ होता जेव्हा लाखो प्रवासी काम केल्यानंतर मुंबईच्या लोकल ट्रेनमधून घरी परततात.
एका आरोपीचा कोठडीतच मृत्यू
मुंबई रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या एका आरोपीचा खटल्यादरम्यान कोठडीतच मृत्यू झालेला आहे. बाकीचे सर्व आरोपी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टापुढे हजर होते. या निकालानंतर सर्व आरोपींनी हात जोडून कोर्टाचे आभार मानले.
कसे घडवले साखळी बॉम्बस्फोट?
अवघ्या 11 मिनिटांत झालेल्या 7 साखळी स्फोटांत तब्बल 189 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 827 लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाईम बॉम्ब ठेवत मुंबई लोकलमधील फर्स्ट क्लासच्या डब्यांना लक्ष्य केले होते. मुंबई सत्र न्यायालयातील मकोका न्यायालयाने 9 वर्षांनंतर याप्रकरणी निकाल दिला होता. न्यायालयाने यातील 12 पैकी 5 आरोपींना फाशी, तर बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.