Akola Vidhan Sabha Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली.
अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. यात अकोला पूर्व मतदारसंघातून पक्षाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, तर बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली.
शिवसेना (ठाकरे गट)तर्फे विधानसभा निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बाळापुर आणि अकोला पूर्व या दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी मध्ये जागा साठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, आता या दोन्ही ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसने या दोन्ही जागेवरील आपाल दावा सोडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गोपाल दातकर हे अकोला पूर्वकरिता २८ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज भरणार असल्याची माहिती आहे. तर बाळापुर मतदार संघासाठी नितीन देशमुख २९ ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शन करून आपलं नामांकन अर्ज भरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.