परभणी : आपली परभणी, स्वच्छ परभणी फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, परभणी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती बसस्थानकात रविवार, 25 जानेवारी रोजी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत परभणी मध्यवती बसस्थानकाची स्वच्छता करण्यात आली असून प्रवाशांत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली.

परभणी येथील हृदयरोग व मधुमेहतज्ञ मेजर डॉ.राहूल आंबेगावकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आपली परभणी, स्वच्छ परभणी या मोहिमेअंतर्गत परभणी मध्यवर्ती बसस्थानकाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी आपली परभणी, स्वच्छ परभणी फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य डॉ.संदिप कार्ले, पराग चौधरी, डॉ.मयूर आष्टीकर, अशोक डुकरे, उमेद मिलके, नागनाथ मुंजे, शिवाजी वांगे, अतुल बावणे, अक्षय कुलकर्णी, किरण नांदापूरकर, आदित्य राऊत, प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक रितेश झांबड, शंकर आजेगावकर, गोविंद मोरे, परभणीचे विभाग नियंत्रक सचिन डफळे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळम, संदेश गुरव, ज्ञानेश्वर पांचाळ, अनिल घोडके, के.डी. पोळ आदींची उपस्थिती होती. या स्वच्छता मोहिमेत कुसुम इंग्लिश अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.