A boy riding a bike died in a tractor collision: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हि धक्कादायक घटना 30 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सिन्नगाव जहाँगीर ते गारगुंडी रस्त्यावरील पुलानजीक घडली.
देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हि धक्कादायक घटना 30 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सिन्नगाव जहाँगीर ते गारगुंडी रस्त्यावरील पुलानजीक घडली.
शनिवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास 14 वर्षीय राजू अनिल पवार ( रा. मेव्हणाराजा) हा आपल्या काळ्या रंगाच्या विना नंबरप्लेट असलेल्या दुचाकीने घरी जात होता. दरम्यान, भरधाव वेगाने येत असलेल्या एमएच-30 जे-9386 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत राजू गंभीर जखमी झाला होता. परिसरातील लोकांनी राजुला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, दुर्दैवाने रात्री उशिरा त्याचे उपचाराअंती निधन झाले. या घटनेची माहिती श्याम राम शिराळे यांनी देऊळगाव राजा पोलिसांना दिली. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार माधव कुटे हे करीत असून, प्राथमिक तपास पोलीस हवालदार रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवल्याने अपघात घडला. आपघातास ट्रॅक्टरचालक जबाबदार असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.
जिल्ह्यात अपघात वाढले
गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अपघात वाढल्याचे चित्र आहे. मागील चार दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात घडले आहेत. वाढते अपघात हा चिंतनाचा विषय असून, वाहतूक पोलिसांनी यावर उपाययोजना राबविल्या पाहिजेत, अशी मागणी होत आहे. नव्हे तर दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याने बऱ्याचदा डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत होवून अनेकजण मृत पवल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका शहराठिकाणी हेल्मेटसक्ती करण्यात आली. आता जिल्ह्यात देखील हेल्मेटसक्ती करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.