dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

लाडकी बहीण योजना की लाभ बंद योजना? ‘लाडक्या बहिणींचा’ संताप रस्त्यावर!

वाशिम : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असतानाही मागील हप्ता न मिळाल्याने संतप्त महिलांनी सोमवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाला जाब विचारत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवायसी पूर्ण करूनही लाभ मिळत नसल्याने शेकडो महिला दररोज जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व बालविकास कार्यालयात खेटे घेत आहेत. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने ई-केवायसी करण्यात आल्याने अनेक महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली.

तसेच, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला, चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिला, अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या तसेच इतर निकषात न बसणाऱ्या महिलांचा लाभ बंद करण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, सर्व निकष पूर्ण करूनही लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचा दावा अनेक महिलांनी केला आहे.  केवायसीमधील दुरुस्ती करण्याची कोणतीही संधी उपलब्ध नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता मिळालेला नाही, अशीही तक्रार महिलांनी केली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन केवायसी दुरुस्तीची संधी उपलब्ध करून द्यावी, पात्र महिलांचा लाभ तातडीने सुरू करावा तसेच थकीत हप्ते वर्ग करावेत, अशी जोरदार मागणी संतप्त महिलांनी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top