प्रियांका राक्षे यांनी घेतला नगराध्यक्ष पदाचा पदभार; उपनगराध्यक्षपदी विशाखा राखे यांची निवड

परतूर : शहराच्या नगराध्यक्षा म्हणून प्रियंका शहाजी राक्षे यांनी पदभार हाती घेतला आहे. यावेळी उपनगराध्यक्षपदी विशाखा विजय राखे यांची निवड तर स्वीकृत सदस्यपदी संदीप बाहेकर आणि विनायक काळे यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आहे.

परतूर : शहराच्या नगराध्यक्षा म्हणून प्रियंका शहाजी राक्षे यांनी पदभार हाती घेतला आहे. यावेळी उपनगराध्यक्षपदी विशाखा विजय राखे यांची निवड तर स्वीकृत सदस्यपदी संदीप बाहेकर आणि विनायक काळे यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात होते. अखेर ईश्वर चिठ्ठीद्वारे २ नावे निश्चित करण्यात आली. लॉटरीत संदीप बाहेकर व विनायक काळे यांच्या नावांची निवड होताच सभागृहात जल्लोष झाला. राजकीय दृष्टिकोनातून पाहता या निवडीमुळे सत्ताधारी गटाच्या संख्याबळात वाढ झाली असून आगामी सभांमध्ये निर्णयप्रक्रियेत त्यांना अधिक बळ मिळणार आहे. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रियंका राक्षे व उपनगराध्यक्ष विशाखा राखे यांच्या पदग्रहण समारंभात त्यांनी राजकीय कुरघोड्यांना थेट इशारा देत, परतूरच्या सर्वांगीण विकासाला युद्धपातळीवर प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले. तर स्वीकृत सदस्यपदी निवडीनंतर संदीप बाहेकर, व विनायक काळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू, सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून शहरहितासाठी कठोर निर्णय घेण्यात येतील. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल लोणीकर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते प्रकाश चव्हाण, नगरसेविका रत्नमाला सोनवणे, इजरान कुरेशी, स्नेहा अग्रवाल, पूजा काळे, डॉ.प्रदीप सातोनकर, रुबीना अन्सारी, रजाक कुरेशी, कदीर कुरेशी, ऋषिकेश कराळे, फातिमा काजी अखिलोदिन, शीला राऊत, तौसिफ शेख, ज्ञानेश्वर जैद, सतीश सोनवणे आदींसह  शहरातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »