dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मुला-मुलींची लग्ने कमी खर्चात करा : मनोज जरांगे

भोकरदन : मुला-मुलींची लग्ने कमी खर्चात करून उर्वरित रक्कम संसारासाठी उपयोगी भांडवल म्हणून उभी करावी. अनावश्यक खर्च टाळून तरुण पिढीला उद्योग-व्यवसायाकडे वळवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

भोकरदन : मुला-मुलींची लग्ने कमी खर्चात करून उर्वरित रक्कम संसारासाठी उपयोगी भांडवल म्हणून उभी करावी. अनावश्यक खर्च टाळून तरुण पिढीला उद्योग-व्यवसायाकडे वळवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले. 

तालुक्यातील भंडारगड येथे दिलीप पाटील वाघ यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहास मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी हरिनाम सप्ताहात सहभागी झालेल्या भाविकांना त्यांनी मार्गदर्शन केले.

 जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून नांदेड जिल्ह्याला पहिला आयपीएस अधिकारी मिळाल्याचा उल्लेख करत समाजासाठी हे मोठे व प्रेरणादायी यश असल्याचे सांगितले. शिक्षण, संयम आणि संघटित प्रयत्नांमुळेच समाज प्रगती करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हरिनाम सप्ताहात उपस्थित भाविकांनी त्यांच्या विचारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धार्मिकतेसोबतच सामाजिक प्रबोधन घडल्याने या भेटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आरक्षणाचा लढा हा कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या मागे फिरण्यासाठी नाही, तर समाजाच्या हक्कासाठी आहे. आजची संपूर्ण युवा पिढी ही राजकीय स्वार्थापेक्षा समाज बांधवांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली पाहिजे. संघटन हीच आपली खरी ताकद आहे.

मराठा समाजातील गोरगरिब, कष्टकरी कुटुंबातील मुलांना न्याय मिळावा, त्यांना शिक्षण, नोकरी आणि संधी मिळावी यासाठी हा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे युवकांनी केवळ घोषणांपुरते मर्यादित न राहता, समाजातील गरजू बांधवांना मदतीसाठी धावून यावे.

हा लढा शांततेचा, संविधानिक आणि न्याय मिळेपर्यंत अखंड सुरू राहील. समाज एकत्र आला तर आरक्षण निश्चितच मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top