dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नियंत्रण सुटल्याने ॲशिअर टेम्पो पुलात घुसला; चालकाचा जागीच मृत्यू

शहागड : अंबड तालुक्यातील शहागड येथे भरधाव ॲशिअर टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट पुलात घुसून भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर, शहागड (ता. अंबड) परिसरात घडली.

मृत चालकाचे नाव बसवराज चिंतामण लामतुरे (वय ५२, रा. पोकळवाडी, ता. निलंगा, जि. लातूर) असे आहे. 

    ॲशिअर टेम्पो क्रमांक एम.एच. २४ बीएच ००५२ हा वाहन गुजरात राज्यातील वापी येथून आंध्र प्रदेशकडे जात असताना सकाळी शहागडजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पाहता पाहता टेम्पो मोठ्या नाल्यावरील पुलाजवळील खड्ड्यात जाऊन जोरात आदळला.

या धडकेत टेम्पोच्या कॅबिनचा अक्षरशः चुराडा झाला. अपघात इतका भीषण होता की चालक बसवराज लामतुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच शहागड परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत चालकाला वाहनातून बाहेर काढले.

घटनेची माहिती मिळताच शहागड पोलीस चौकीचे जमादार रामदास केंद्रे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top