मेथीची आवक वाढल्याने भाव कोसळले

जाफ्राबाद :  गेल्या काही दिवसापासून बाजारात मेथीची आवक वाढल्याने मेथीचे भाव कोसळले आहेत. हजारो रुपये खर्च करुन उत्पादीत केलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री करावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता खामखेडा येथील शेतकऱ्यांनी मका पिकात आंतर पीक म्हणून मेथीची लागवड केली होती. मेथीच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी बीयाणे, खत, औषध फवारणी आदीवर हजारो रुपयांचा खर्च केला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मेथीचे पीक जोमदार आल्याने भाजीपाल्याला भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या काही दिवसात मेथीची आवक बाजारात वाढल्याने मेथीचे भाव कोसळले आहेत. पूर्वी वीस ते पंचवीस रुपयाला मेथीची एक जुडी विकल्या जात होती. परंतु आता दहा रुपयाला दोन जुड्या दिल्या तरी ग्राहक घेत नसल्याने भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असल्याचे खामखेडा येथील शेतकरी दत्तू कल्याण जाधव यांनी दैनिक ‘महाभूमि’ प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »