छत्रपती संभाजीनगर : मतमोजणी केंद्रात जाण्याच्या शिल्लक कारणावरून शुक्रवारी, 16 जानेवारी रोजी सकाळी शासकीय तंत्रनिकेतन मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेना शिंदेगट आणि पोलिसांमध्ये वाद झाला, ओळखपत्र असताना अडवले जात असल्याचा आरोप करीत उमेदवार प्रतिनिधींनी आरोप केला, त्यानंतर लागलीच पोलिसांनी लाठीमार केला. यात चार शिवसेना पदाधिकाऱ्यांसह माजी महापौर जखमी झाले आहेत.

महापालिका निवडणुकीची मतमोजणी शहरातील ४ मतमोजणी केंद्रांवर सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या केंद्रावर प्रभाग क्रमांक २१, २२, २७, १८, १९, २० ची मतमोजणी होत आहे. याशिवाय गरवारे स्टेडियमवर प्रभाग १, ७, ८, ९, १०, ११, २३, २४, २५ ची मतमोजणी होत आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रभाग १५, १६, १७, २६, २८, २९ ची तर सेंट फ्रान्सीस हायस्कूलमध्ये प्रभाग ३, ४, ५, ६, १२, १३, १४ ची मतमोजणी होत आहे.
यातील शासकीय तंत्रनिकेतनच्या केंद्रासमोर मतमोजणी केंद्रात जाण्याच्या कारणावरून शिल्लक वाद झाला. हा वाद नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी लाठीमार केला. यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना बदडण्यात आले. माजी महापौर विकास जैन यांच्यासह ४ कार्यकर्ते जखमी झाले आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मतमोजणी केंद्रावर धाव घेतली. पोलीस आयुक्त प्रवीण पवार हेही आले. पालकमंत्र्यांनी पोलिसांवर तीव्र शब्दांत टीका केली.
त्यांनी पोलीस आयुक्तांना याचा जाब विचारला. प्रतिनिधींकडे आयकार्ड असताना बळाचा वापर करणे शुद्ध मस्तवालपणा असून, रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना पोलीस बेफिकीर आहेत आणि प्रतिनिधींना मारहाण करतात, ही कसली कायदा-सुव्यवस्था? असा सवाल त्यांनी केला. दोषी पोलीस अधिकारी देशमुख यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जखमी कार्यकर्त्यांशी फोनवरून संवाद साधत माहिती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी बघण्यासाठी महाभूमिच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा