dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घराला आग लागून लाखोचे रुपयांचे नुकसान

छत्रपती संभाजीनगर :  शॉर्टसर्कीटने घराला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना रविवार, 11 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास न्यु नंदनवन कॉलनी परिसरातील चाँदमिरी मस्जिद जवळ घडली असल्याची माहिती मनपा अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली.

न्यु नंदनवन कॉलनी परिसरातील चाँदमिरी मस्जिद जवळ असलेल्या एका घरात शॉर्टसर्कीट होवून रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती शेख नवीद यांनी पद्मपुरा अग्निशमन दलाला आणि छावणी पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर, उपअग्निशमन अधिकारी विनायक कदम, डयुटी अधिकारी कुलकर्णी, अग्निशामक जवान सुरज राठोड, अक्षय नागरे, अजिंक्य भगत, मतीन, विनोद बमने, सचिन फुले, एन.आर. घुगे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. तो पर्यंत घरातील फर्निचर, एलईडी टीव्ही व इतर गृहउपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top