भरधाव कार टपरीत घुसली, एक ठार, एक गंभीर

खामगाव :  एका कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सदर भरधाव कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका टपरीमध्ये घुसली. या भिषण अपघातात टपरीमधील एक जण ठार झाला तर एक जण गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना 10 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान घडली.

खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा गावातून जाणारी भरधाव कार क्रमांक एमएच 04 एफआर 2948 ही खामगावकडे येत असतांना चालकाचा सदर कारवरील नियंत्रण सुटल्याने सदर कार रस्त्यालगत असलेल्या एका टपरीच्या हॉटेलमध्ये घुसली. या भिषण अपघातात हॉटेलमधील अर्जुन तेल्हारकर रा. सगोडा ता. पातुर हे गंभीर स्वरूपाने जखमी होवून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर हॉटेलमधील दुसरा व्यक्ति धम्मा मोरे रा. टेंभुर्णा हा गंभीर स्वरूपाने जखमी झाला. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. व जखमी धम्मा मोरे याला तातडीने उपचारार्थ येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. तेथे प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी अपघाताला कारणीभूत असलेली कार जप्त केली आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाल्याची माहिती आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »