क्रिकेट लीग स्पर्धेत काबरा वॉरियर्स संघ ठरला विजेता

जालना : स्व. धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनाच्यावतीने जुन्या औद्योगिक वसाहतीतील केनिया टर्फवर चार दिवसीय माहेश्वरी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत पार पडली. या स्पर्धेत काबरा वॉरियर्स संघ विजेता तर बी प्लस सुरक्षा संघ उपविजेता ठरला आहे.

जालना : स्व. धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालनाच्यावतीने जुन्या औद्योगिक वसाहतीतील केनिया टर्फवर चार दिवसीय माहेश्वरी बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत पार पडली. या स्पर्धेत काबरा वॉरियर्स संघ विजेता तर बी प्लस सुरक्षा संघ उपविजेता ठरला आहे.

या चार दिवसीय डे नाईट स्पर्धेत आनंदनगरी स्ट्रायकर्स, काबरा वॉरियर्स, पॅव्हिलियन स्ट्रायकर्स, बीएम टायटन्स, काका स्ट्रायकर्स, एमएम टायटन्स, ललित लान्सर्स, एमकेटी इन्शुरन्स ब्रोकर्स, होलानी पँथर्स, बी प्लस सुरक्षा या दहा संघांच्या 100 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामना काबरा वॉरियर्स विरुद्ध बी प्लस सुरक्षा यांच्यात झाला आणि त्यात 30 धावांनी विजय मिळवून काबरा वॉरियर्स संघ या स्पर्धेचा विजेता तर बी प्लस सुरक्षा संघ उपविजेता ठरला. राहुल तोतला उत्कृष्ट फलंदाज, संदीप राठी उत्कृष्ट गोलंदाज, रवी लोया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉ. श्रद्धा सोमानी उत्कृष्ट महिला खेळाडू तर रोहित भक्कड प्रेस्टीजीएस बॅट्समन ठरला. विजेत्या, उपविजेत्या संघाला अनुक्रमे 15 हजार आणि 10 हजार रुपयाचे रोख बक्षीस, ट्रॉफी प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरण समारंभाला जालना जिल्हा माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष दामोदर बजाज, शहराध्यक्ष विजय राठी, सुनील बियानी, स्व. धोंडाबाई तोतला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष ॲड. अर्चना तोतला, सचिव डॉ. नितीन तोतला, व्यवस्थापन समितीचे रामेश्वर राठी, सचिन चरखा, विपिन मोहता, सुरेश राठी, संतोष दुधानी यांच्यासह संघ मालक आणि समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »