गोंवश तस्करी व गोमांस विक्रीप्रकरणी ३२ जणांवर कारवाई

जालना : जिल्ह्यात अवैध गोंवश तस्करी तसेच गोमांस विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विशेष मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दाखल असलेल्या गोंवस तस्करी व गोमांस विक्रीशी संबंधित रेकॉर्डवरील ३२ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.      

      संबंधितांकडून शांतता भंग न करण्याचे व चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यात आले आहे.

दरम्यान, चालू वर्षात जालना जिल्ह्यात गोंवस तस्करीविरोधात एकूण ६१ कारवाया करण्यात आल्या असून, त्यामधून ४७८ जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवायांमुळे जिल्ह्यातील अवैध तस्करीवर आळा बसण्यास मदत होत आहे.

     ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप भारती, पोलीस निरीक्षक संतोष साळवे तसेच पोलीस हवालदार फुलचंद गव्हाणे, नजीर पटेल, राहुल कटकम, अजीम शेख, राहुल भागीले, प्रताप जोनवाल यांच्यासह संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »