dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देवठाणा–कारपा रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात रास्ता रोको: १५ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन; आंदोलन मागे

मानोरा : तालुक्यातील देवठाणा ते कारपा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरून चाळणी झाल्याचे चित्र आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या एक वर्षापासून संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर गोरसेना गोरशिकवाडी संघटनेच्या वतीने प्रशासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मानोरा : तालुक्यातील देवठाणा ते कारपा या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरून चाळणी झाल्याचे चित्र आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या एक वर्षापासून संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर गोरसेना गोरशिकवाडी संघटनेच्या वतीने प्रशासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.  ३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता मानोरा–मंगरूळपीर राष्ट्रीय महामार्गावर, मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाजवळ हे आंदोलन छेडण्यात आले. तब्बल अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती.

देवठाणा–कारपा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून कोणतीही देखभाल न झाल्याने अत्यंत खराब झाला आहे.  या संदर्भात देवठाणा व कारपा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी  २९ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र एक वर्ष उलटूत असतानाही जिल्हा परिषद विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने हा ग्रामस्थांवर अन्याय असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनस्थळी जिल्हा परिषद उपविभाग कारंजाचे उपअभियंता यांनी भेट देत येत्या १५ दिवसांत रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर गोरसेना गोरशिकवाडी संघटनेने आंदोलन मागे घेतले. यावेळी नायब तहसीलदार, संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रामबाबू सरोदे यांच्या देखरेखीखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनात गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाल चव्हाण, पोहरादेवीचे सुधाकर महाराज, प्रहार जनशक्ती पक्ष चे पदाधिकारी, माजी जि. प. सदस्य सचिन रोकडे, शेतकरी नेते मनोहर राठोड, देवठाणा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश राठोड, उपसरपंच पंकज चव्हाण  सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top