dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मिशन वात्सल्य पूर्णत्वास.. दुरावलेले बिबट्याचे पिल्लू अखेर आईच्या कुशीत विसावले!

डोणगाव : आईपासून दुरावलेले बिबट्याचे पिल्लू  तब्बल 35 तासानंतर आईच्या कुशीत विसावल्याने वनविभागाने सुरू केलेले ‘ मिशन वात्सल्य’पूर्णत्वास आले आहे. 

डोणगाव : आईपासून दुरावलेले बिबट्याचे पिल्लू  तब्बल 35 तासानंतर आईच्या कुशीत विसावल्याने वनविभागाने सुरू केलेले ‘ मिशन वात्सल्य’पूर्णत्वास आले आहे. 

 31 डिसेंबरच्या सकाळी 8 वाजता दरम्यान कळंबेश्वर येथील सुभाष खुरद यांच्या गोठ्यात आपल्या पिलाला एकटे सोडून नर व मादी बिबट जंगलात पसार झाले होते. याची माहिती मिळताच वनविभागाने बिबटयाच्या पिलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यासाठी ‘ मिशन वात्सल्य’ मिशन सुरू केले होते. या मिशनला 35 तासाच्या परिश्रमानंतर यश आले. 31 डिसेंबर नंतरचे काही तास दुरावलेले ते बिबट्याचे पिल्लू वन विभागाच्या ताब्यात होते. त्यानंतर त्याच रात्री त्या पिलाला आईच्या स्वाधीन करण्यासाठी वन विभागाने तयारी केली मात्र ती तयारी अयशस्वी झाली.दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीच्या संध्याकाळी 5 वाजता दरम्यान वन विभागाने ज्या ठिकाणाहून आई व पिल्लू दुरावलेले होते त्याचं ठिकाणी कॅरेटमध्ये बिबट्याचे पिल्लू ठेवण्यात आले सोबतच आजूबाजूला मोशन सेन्सर असलेले कॅमेरे लावण्यात आले वन विभागाचे कर्मचारी सावधगिरी बाळगूण सुरक्षित ठिकाणी थांबले. तेव्हा 7 वाजून 35 मिनिटांनी मादा बिबटने  कॅरेट जवळ जाऊन कॅरेट खाली पाडले व त्यातील आपल्या पिलाला घेऊन ती निघून गेली. याची चाहूल लागताच वनविभागाने थर्मल ड्रोनद्वारे पाहणी करत मिशन वात्सल्य पूर्णत्वास आले याची खात्री केली.

वनविभागाचे परिश्रम फळाला

    मिशन वासल्यसाठी उपवन संरक्षण अधिकारी सरोज गवस, सहाय्यक वन संरक्षण अधिकारी वैभव काकडे, आरआरयु टीम व घाटबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांनी घेतलेले परिश्रम अखेर फलद्रूप झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top