मुंबईच्या कलाकाराने रेखाटले देवदेवतांचे हुबेहूब छायाचित्र

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे संत श्रीपाद बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व प्रवचन, हरीनाम कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

अकोलादेव : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे संत श्रीपाद बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ व प्रवचन, हरीनाम कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात अध्यात्मासोबतच कलेचाही अनोखा उत्सव साजरा होत आहे. प्रसिद्ध कीर्तनकार हभप भगवान शिंदे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सप्ताहात, मुंबई येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार नंदु शिंदे यांनी रांगोळीच्या माध्यमातून देवदेवतांचे-संतांच्या हुबेहूब प्रतिमा साकारल्या आहेत. या कलाकृती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून परिसरात भक्तीचा महापूर लोटला आहे.

या हरीनाम सप्ताहामध्ये मुंबईचे हभप शिंदे महाराज यांच्या रसाळ कीर्तनाचा लाभ भाविक घेत आहेत. त्यांच्या उपस्थितीने गावात चैतन्य पसरले असतानाच, रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या संतांच्या प्रतिमांनी या सोहळ्याची शोभा द्विगुणित केली आहे. रांगोळीतून विठ्ठल-रखूमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, श्रीगणेश मूर्ती, महादेव अशा प्रतिमा साकारल्या आहेत, ज्या पाहून जणू संत प्रत्यक्ष दर्शन देत आहेत, असा अनुभव भाविकांना येत आहे. केवळ रांगोळी आणि रंगांचा वापर करून चेहऱ्यावरील हावभाव इतक्या जिवंतपणे मांडणे हे कलाकारांच्या अचाट कौशल्याचे प्रतीक आहे. सप्ताहाच्या निमित्ताने दर्शनासाठी येणारे भाविक या रांगोळी प्रदर्शनापाशी थांबून कलाकारांच्या कलेचे भरभरून कौतुक करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »