भोकरदन शहरातील क्रीडा संकुलाचा कायापालट होणार; तरुणांच्या मदतीला धावले नवनिर्वाचित नगरसेवक

भोकरदन : राज्यात येत्या २० जानेवारीपासून पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरातील शेकडो तरुण-तरुणी स्थानिक क्रीडा संकुल मैदानावर कसून सराव करत आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या मैदानाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, त्याचा मोठा फटका सराव करणाऱ्या उमेदवारांना बसत होता. ही बाब लक्षात घेता, नवनिर्वाचित नगरसेवक दीपक मोरे व राजू सहाणे यांनी स्वतः मैदानात उतरून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

शहरातील क्रीडा संकुल मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून देखभालीचा अभाव होता. मैदानाची अक्षरश: चाळण झाली होती. धावपट्टीवर रनिंग ट्रॅक खड्डे पडले होते, ठिकठिकाणी दगड-धोंडे असल्याने सराव करताना मुला-मुलींना दुखापत होण्याचे प्रमाण वाढले होते. मैदानाची अक्षरश चाळण झाल्याने सराव करायचा कसा? असा प्रश्न पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसमोर उभा ठाकला होता. पोलीस भरती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. ही अडचण समजताच नगरसेवक दीपक मोरे आणि राजू सहाणे यांनी शनीवारी सायंकाळी प्रत्यक्ष मैदानाला भेट देऊन पाहणी केली. केवळ पाहणी करून न थांबता, त्यांनी मुलांच्या अडचणींचा आढावा घेतला आणि मैदानाची दुरुस्ती आजपासूनच सुरू होईल” असा शब्द दिला. यासाठी तातडीने आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून, मैदानाचे सपाटीकरण आणि अडथळे दूर करण्याचे काम रविवारी युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यामुळे आता पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या शेकडो मुला-मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. भरतीच्या तोंडावर लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मैदानीची समस्या तत्काळ सोडल्याबद्दल तरूणांच्या वतीने नगरसेवक मोरे व सहाणे यांचा सत्कार करण्यात आला.

    वेळ वाया घालवून चालणार नव्हते

पोलीस भरतीसाठी तयारी करणारी ही मुले-मुली आपल्याच कुटुंबातील आहेत. शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील ही मुले अहोरात्र मेहनत करून खाकी वर्दीचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, मैदानाची दुरवस्था झाल्यामुळे त्यांच्या सरावात अडथळे येत होते आणि त्यांना शारीरिक दुखापत होण्याची भीती होती, ही बाब अत्यंत गंभीर होती. राज्यात २० जानेवारीपासून मैदानी चाचण्या सुरू होत आहेत, त्यामुळे वेळ वाया घालवून चालणार नव्हते. म्हणून आम्ही तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. आमचे ध्येय केवळ आश्वासन देणे नाही, तर या तरुणांना हक्काचे आणि दर्जेदार मैदान उपलब्ध करून देणे हे आहे.

 – दीपक मोरे, नगरसेक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »