dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विद्यार्थीनींना घेवून जाणारी बस आशयर ट्रकवर आदळली 15 विद्यार्थींनी जखमी

जळगाव जामोद :  मानव मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थींनींची वाहतूक करणारी परिवहन मंडळाची बसचा नांदुरा-जळगाव जामोद मार्गावर अपघात झाला असून आशयर ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने सदर बस पाठीमागून ट्रकवर धडकल्याची घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता घडली. या अपघातात बसमधील 15 विद्यार्थींनी किरकोळ जखमी झाल्या.

मानव मिशन अंतर्गत जळगाव जामोद येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थींसाठी परिवहन मंडळाकडून स्पेशल बस चालविल्या जाते. दरम्यान 27 डिसेंबर रोजी जळगाव जामोद येथून विद्यार्थींनींना घेवून नांदुराकडे जाणाऱ्या मानव मिशनची बस क्रमांक एमएच 14 -बीटी- 4539 ही कुरणगाड जात असतांना सुपो जिनिंग आणि टाकळी फाट्याच्या मधात आयशर क्रमांक एमएच 43 – 6931 ने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येणाऱ्या मानव मिशनच्या बसने आयशरला जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 15 विद्यार्थींनी जखमी झाल्या आहेत. जखमी विद्यार्थींनींना उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. यामध्ये वाहक जी. आर. खुजणारे सुद्धा किरकोळ जखमी झाले आहे तर चालक एस. आर. इंगळे हे पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यासाठी हजर झाले होते. या अपघातात एसटीबसचे मोठे नुकसान झाले आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top