dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मासे पकडायला गेलेल्या मामासह दोन भाच्यांचा तलावात बुडून मृत्यू

मंगरूळपीर : तालुक्यातील सनगाव शेतशिवारात २५ डिसेंबर रोजी मासे व खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मामा आणि दोन भाचे अशा तिघांचा तलावात बुडाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २६ डिसेंबर रोजी आसेगाव पोलिसांच्या पुढाकाराने शोध व बचाव कार्य राबविण्यात आले. 

मंगरूळपीर : तालुक्यातील सनगाव शेतशिवारात २५ डिसेंबर रोजी मासे व खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मामा आणि दोन भाचे अशा तिघांचा तलावात बुडाल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २६ डिसेंबर रोजी आसेगाव पोलिसांच्या पुढाकाराने शोध व बचाव कार्य राबविण्यात आले. पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने रेस्क्यू बोट व साहित्याच्या मदतीने सर्च ऑपरेशन केले. सुमारे १५ फूट खोल पाण्यातून एका तासाच्या आत तलावातील तिन्ही मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  

आसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लक्ष्मण राजू बनसोड (रा. गुरुकृपा कॉलनी, मंगरूळपीर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सिद्धार्थ मोहन बनसोड (वय ३५) हा मामा असून, त्याचे भाचे अंकुश राजेंद्र भालेराव (वय १५) आणि कार्तिक राजेंद्र भालेराव (वय १२) हे तिघे २५ डिसेंबर रोजी सनगाव येथील तलावात मासे व खेकडे पकडण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही तलावात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच २६ डिसेंबर रोजी सकाळी आसेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन (पिंजर) संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकास पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली बचाव पथक दुपारी घटनास्थळी दाखल झाले.  रेस्क्यू बोट व शोध साहित्याच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन राबवून एका तासात तलावातील तिन्ही मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आले. मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.  या संपूर्ण घटनेवर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, रवी काळे, तहसीलदार सुधाकर अनासुने व नायब तहसीलदार रविंद्र राठोड यांनी लक्ष ठेवले होते. घटनास्थळी आसेगाव पोलीस ठाण्याचे पिआय रामकृष्ण भाकडे, एएसआय गणेश भोयर, हे.कॉ. विजय शिंगारे व पो.कॉ. सुनील उपस्थित होते.  या दुर्दैवी घटनेमुळे सनगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top