dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

नाताळच्या सलग सुट्टयांमुळे संतनगरीत भाविकांची गर्दी; एक लाखाहून अधिक भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

शेगाव : श्री संत गजानन महाराजांचे मंदिरामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावला गुरुवार, शनिवार व रविवार रोजी ख्रिसमस निमित्त सलग सुट्टी तसेच नाताळ सणानिमित्त मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणच्या शाळा महाविद्यालय ऑफिसेसला असणाऱ्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींचे दर्शनास मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली आहे.

शेगाव : श्री संत गजानन महाराजांचे मंदिरामुळे विदर्भ पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावला गुरुवार, शनिवार व रविवार रोजी ख्रिसमस निमित्त सलग सुट्टी तसेच नाताळ सणानिमित्त मुंबई, पुणे यासह अन्य ठिकाणच्या शाळा महाविद्यालय ऑफिसेसला असणाऱ्या दीर्घकालीन सुट्ट्यांमुळे शेगावला श्रींचे दर्शनास मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली आहे. या सलग सुट्ट्यामुळे शेगावात एक लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.

दरवर्षी शेगावला नाताळमध्ये श्रींचे दर्शनासाठी अनेक ठिकाणाहून भाविक भक्तांचा ओढा मोठ्या प्रमाणावर असतो. श्रींचे दर्शन तसेच आनंद सागर या आध्यात्मिक केंद्राचे अवलोकन करण्यासाठी शेगावला भाविक येतात. शेगाव येथे येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या, एसटी बसेसमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडताना दिसतात. यामुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रींचे दर्शनासाठी भाविकांना सरासरी तीन तास व श्रीमुख दर्शनासाठी 40 मिनिटे अवधी लागत आहे. श्री संस्थानकडून भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे. भाविकांसाठी एकेरी मार्ग करण्यात आला असून मंदिरामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात निवास व्यवस्था वारकरी निवास, भक्त निवास विसावा, विहार या ठिकाणी करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे भक्तांची गैरसोय होऊ नये, याची पूर्ण काळजी श्री संस्थानकडून घेतली जात आहे. श्री संस्थांनचे पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची वाहने शिस्तबद्ध उभी असल्याचे दिसून येत आहे. तर मंदिर परिसरात व खाजगी पार्किंग सुद्धा हाऊस फुल्ल झाले आहे.

नव्या वर्षाच्या स्वागता करीता श्रींच्या भाविकांसाठी

31 डिसेंबरला श्रींचे मंदिर रात्रभर उघडे राहणार

श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शेगांव श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर वार बुधवार 31 डिसेंबर रोजी श्री दर्शनार्थ रात्रभर खुले राहील. त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नविन वर्षाची सुरुवात करणार आहे.

श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा

गुरुवार व दशमीच्या दिवशी श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघत असते. 30 डिसेंबर रोजी दशमी असल्याने श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघेल तर 31 डिसेंबर वार बुधवार रोजी पुत्रदा भागवत एकादशी आहे. 1 जानेवारी 2026 रोजी वार गुरुवार आल्याने वर्षाच्या पहिल्याच दिवशी श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघणार असल्याने श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रींच्या पालखीचे दर्शन मिळणार आहे. एकादशी व गुरुवार या दोन दिवशी राज्यातील हजारो भाविक शेगांवची वारी करुन धन्य होतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top