dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बनोटी कालव्यातून रब्बी हंगामासाठी सोडले पहिले आवर्तन

वरठाण : सोयगाव तालुक्यातील बनोटी तलावातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे पहिले आवर्तन गुरुवार, 25 डिसेंबर रोजी सोडण्यात आले. यावेळी सरपंच मुरलीधर वेहळे यांच्या हस्ते कालव्याचे पूजन केल्यानंतर कालव्याचे गेट उघडून पाणी सोडण्यात आले. बनोटी तलावातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील शेती ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्य्क्त केला. 

यंदा पावसाळा लांबल्याने बनोटी तलावाचे रब्बी हंगामातील पहिले आर्वतन एका महिन्याच्या उशीराने सोडण्यात. खरीप हंगाम हातचा गेलेल्या तुडुंब भरलेल्या बनोटी तलावाच्या पाणी आर्वतनावरती परिसरातील शेतकर्‍यांच्या रब्बी हंगामाच्या आशा जागविल्या होत्या. मात्र आर्वतनास उशीर होत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले होते. पाटबंधारे विभागाने गुरुवारी पाण्याचे पहिले आर्वतन सोडण्याचा निर्णय घेतला. बनोटीचे सरपंच मुरलीधर वेहळे यांच्या हस्ते तलावाच्या गेटचे पुजन करुन पाणी सोडण्यात आले. यावेळी तलाव बीट प्रमुख शुभम राजपुत, मोजणीदार रामेश्वर जाधव, श्रीकांत वाकडे, मनोहर सोनवणे, संजय सोनवणे आदी उपस्थित होते. पाण्याचे आवर्तन सुटल्याने परिसरातील वरठाण, पळाशी, वाडी, मुखेड  घोरकुंड, गोंदेगाव शिवारातील मोठ्या क्षेत्र ओलीताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पाण्याचे आर्वतन उशीरा उशीरा सुटले असले तरी पाणी आर्वतन मार्च अखेरपर्यंत चालणार असल्याने शेतकऱ्यांनी नियोजन करीत पिके घ्यावीत असे आवाहन बीट प्रमुख शुभम राजपुत यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top