dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

खामगावातील जगदंबा कॉलनीतून चार तलवारी जप्त

खामगाव : स्थानिक जुना बायपास रोड जगदंबा कॉलनीत टाकलेल्या छाप्यात चार तलवारीसह एक कुकरी असा एकूण १३ हजार रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली. याबाबत पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

       स्थानिक जगदंबा कॉलनी जुना बायपास रोड भागातील रजनीकांत श्रीराम गोल्हार याच्या घरावर शिवाजी नगर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चार तलवारी ज्यावर शिरोही सुप्रसिध्द तलवार, शंभर वर्षाची गॅरंटी असे नमूद आहे. सदर तलवारीच्या पात्याची लांबी ४३ सेंटीमीटर व मुठ १९ सेंटीमीटर आणि पात्याची रुंदी ४ सेंटीमीटर आहे. प्रती तलवार २ हजार रुपये किंमत अशा एकूण ४ तलवारी ८ हजार रुपये व लोखंडी कुकरी किंमत ३ हजार रुपये असा एकूण १३ हजार रुपयाचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत शिवाजी नगर पोस्टेचे निलसिंग चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी रजनीकांत गोल्हार विरुध्द कलम ४/५ शस्त्र अधिनियक सहकलम ३७(१), (३) मुपोका सहकलम १३५, मुपाकानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top