dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त 

खामगाव : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या दुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडून उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकानी 22 लाख 46 हजारांच्या गुटख्यासह  33 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना खामगाव – अकोला मार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ 25 डिसेंबरच्या रात्री उघडकीस आली.

        येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाला माहिती मिळाली की, नांदुरा अकोला मार्गावरून गुटख्याच्या अवैधरित्या वाहतूक केली जात आहे. या गुप्त माहितीवरून पथकाने 25 डिसेंबर रोजी सायंकाळी नांदुरा अकोला महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता एक पांढऱ्या कलरचे डीसीएम ट्रक क्रमांक एम पी 09 जि एच 8165 ची तपासणी करून पाहणी केली असता त्यामध्ये अवैध गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. सदर ट्रक मध्ये अवैध गुटख्याचे एकूण 50 पोते  एकूण रक्कम 22 लाख 46 हजार 400 रुपये तसेच ट्रक किंमत दहा लक्ष असा एकूण 33 लाख 46, 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक ब्रिजगोपाल गुलजारसिंग यदुवंशी (45) रा. इंदोर याच ताब्यात घेतले असून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top