समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी

कारंजा : समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक १९८ येथे उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. २५ डिसेंबर) पहाटे सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

एमएच ०४ जेके ९४१६ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात असताना टायर दुरुस्तीचे काम सुरू होते. याच दरम्यान मागून येणाऱ्या एमएच १४ एचव्ही ७३९५ क्रमांकाच्या ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात सुभाष वाघ (वय २५, रा. मसला, ता. जि. बुलढाणा) आणि संतोष सिंग (वय ३५, रा. जनकपुर, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला. अनिकेत सिंग (वय ३०, रा. जनकपुर, उत्तर प्रदेश) हे जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच कारंजा येथील श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख तसेच शेलुबाजार लोकेशनवरील १०८ रुग्णवाहिका आणि कारंजा येथील १०८ पायलट आतीश चव्हाण, डॉ. गणेश हे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहलता चव्हाण यांनी दोघांना मृत घोषित केले असून एका जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »