dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दुचाकीला मालवाहू वाहनाची धडक; मनसे शहराध्यक्ष ठार

कारंजा : नागपूर–संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारंजा शहर अध्यक्ष हरीश हेडा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २४ डिसेंबर) रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

कारंजा : नागपूर–संभाजीनगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कारंजा शहर अध्यक्ष हरीश हेडा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. २४ डिसेंबर) रात्री सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, हरीश हेडा हे मोटरसायकलने कारंजाकडे येत असताना समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाने (एमएच ३० बीडी ७४९०) नागपूर–संभाजीनगर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच शिवनेरी रुग्णवाहिकेचे संचालक अनुप ठाकरे यांच्या सूचनेनुसार रुग्णसेवक विनोद खोंड घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हेडा यांना तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. हरीश हेडा हे गेल्या सुमारे दहा वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय होते. नुकत्याच पार पडलेल्या कारंजा नगरपरिषद निवडणुकीत त्यांच्या पत्नी अलका हेडा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून कारंजा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top