dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देऊळगाव बाजार येथे श्रमदानातून तीन वनराई बंधाऱ्यांची उभारणी; जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त मंडळाचा स्तुत्य उपक्रम

छत्रपती संभाजीनगर :  सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून तीन नवीन वनराई बंधारे चारणा नदीवर उभारण्यात आले. चारणा नदीवर श्रमदानातून उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे परिसरातील सिंचना आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

भक्तीसोबतच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून समितीने हे समाजोपयोगी कार्य हाती घेतले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. देऊळगाव बाजार येथील चारणा नदीवर बांधलेल्या या तीन बंधाऱ्यांमुळे परिसरातील पाणीपातळीत वाढ होणार असून त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतीसाठी होणार आहे. संप्रदायाच्या वतीने प्रत्येक समितीला तीन ते पाच बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी देऊळगाव बाजार येथील भक्त परिवारातील सर्व गुरुबंधूंनी मोलाचे सहकार्य करत उपक्रम यशस्वी केला. या उपक्रमामुळे परिसरात जलसंधारणाची मोठी चळवळ उभी राहत असून इतर गावांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याचे रघुनाथ पाटील गोंगे यांनी सांगितले. यावेळी प्रदिप वरसाळे, विष्णु दांगोडे, गणपत कुंटे, गीता उटाडे, पुजा ताटू, पद्मा गोंगे, रेखा कुंटे, संगिता कुंटे, कडूबाई साळवे, दुर्गाबाई शिंदे आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top