पाटेगाव शिवारात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह  

पैठण :  तालुक्यातील पाटेगाव शिवारात असलेल्या गोदावरी नदी पात्रात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह मंगळवार, २३ डिसेंबर रोजी आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पैठण :  तालुक्यातील पाटेगाव शिवारात असलेल्या गोदावरी नदी पात्रात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह मंगळवार, २३ डिसेंबर रोजी आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या आठवडाभरात खुनाच्या दोन घटना घडल्यामुळे पैठण तालुक्याची वाटचाल गुन्हेगारी जगताकडे होत असल्याची चर्चा पैठण तालुक्यात सुरू आहे.

पठाण पोलिसांनी मयत युवकाचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरे तपासणीसाठी पैठण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल  केला आहे. या घटनेमुळे पैठण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पैठण पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत असल्याची माहिती पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे यांनी दिली. तसेच मैताचे ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »