गंगापूर : तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथे सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महिला एकवटल्या आहेत. संतप्त महिलांनी सोमवार , 22 डिसेंबर रोजी गाव बंद आंदोलन करून जोरदार निदर्शने केली.

वाळूज एमआयडीसी परिसरातील रांजणगाव शेणपुंजी भागात गेल्या काही दिवसापासून अवैध धंदे बोकाळले आहेत त्यामध्ये जुगाराचे अड्डे, पत्त्याचे क्लब, अवैध दारू विक्री, छुपा वेश्याव्यवसाय आधी धंद्यांना ऊत आला असून कामगार मंडळी दिवसभर काम करून सायंकाळच्या वेळी जुगाराच्या अड्ड्यावर पत्ते खेळण्यात व्यस्त होत असताना दिसून येत आहेत. तर काहीजण कामावरून घरी परतताना मद्यपान करून रस्त्याने आरडाओरडा करीत घराची वाट धरतात यामुळे रांजणगाव शेणपुंजी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राजनगाव शेणपुंजी परिसरात छुपा वेश्याव्यवसाय ही सुरू असून येथे येणारे आंबट शौकीन ग्राहक रस्त्याने एकट्याने जाणाऱ्या महिला व मुलींची छेड काढतात असे आंदोलक महिलांनी सांगितले. रांजणगाव शेणपुंजी परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या महिलांनी दिला.