परतूर नगरपालिकेत भाजपच्या प्रियांका राक्षे किंगमेकर: इतिहासात पहिल्यांदाच भाजप उमेदवाराला नगराध्यक्षपद

परतूर : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्रियांका राक्षे या 9 हजार 193 मते घेऊन विजयी झाल्या आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे यांना 7 हजार 475 तर काँग्रेसच्या प्रतिभा बंड यांना 4 हजार 367 मते मिळाली.

परतूर : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्रियांका राक्षे या 9 हजार 193 मते घेऊन विजयी झाल्या आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शांताबाई हिवाळे यांना 7 हजार 475 तर काँग्रेसच्या प्रतिभा बंड यांना 4 हजार 367 मते मिळाली.

23 सदस्य संख्या असलेल्या येथील नगरपालिकेत भाजपचे 6, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 6, अजित पवार गटाचे 5, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 3 व काँग्रेसचे 3 सदस्य निवडून आले आहेत. दरम्यान, पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान मिळाला आहे.

 – जनतेचा विश्वास सार्थ ठरवू : आ. लोणीकर

परतूर – मतदारांनी भाजपच्या उमेदवार प्रियांका राक्षे यांना निवडून देऊन जो विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवू, असा विश्वास माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर, प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. नगरपालिकेच्या अध्यक्षपदी प्रथमच भाजप उमेदवाराला यश मिळाले आहे याचा आनंद असून आपण मागील काळात शहरात तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात केलेल्या विकास कामाचे हे फलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परतूर तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच मोठे सहकार्य केलेले असून यापुढेही विकासाची अनेक कामे हाती घेण्यात येऊन परतूर शहराचा चेहरामोहरा बदलविणार आहोत, असेही लोणीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »