वाशिम : नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंदळे यांनी अखेरच्या आठव्या फेरीअखेरही आपली आघाडी कायम ठेवत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी ७,९६९ मतांच्या फरकाने विजय संपादन केला असून शिवसेना (उबाठा)च्या उमेदवार रेखा मापारी यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

अंतिम निकालानुसार अनिल केंदळे यांना २३,९४२ मते मिळाली, तर रेखा मापारी यांना १५,९७३ मते मिळाली. त्यामुळे भाजप उमेदवार अनिल केंदळे हे ७,९६९ मतांनी विजयी ठरले. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत अनिल केंदळे यांना स्पष्ट आघाडी मिळत राहिली. फेरीनिहाय आघाडी वाढत गेल्याने सहाव्या फेरीनंतरच त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. त्यामुळे समर्थकांनी विजय रॅलीची तयारी सुरू केली होती. महालक्ष्मी पेट्रोलपंप परिसरातील अनिल केंदळे यांच्या निवासस्थानी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठी गर्दी करत जल्लोषाला सुरुवात केली. विजयानंतर मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची आतिषबाजी, डीजे व ढोल-ताशांच्या तालावर भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. वाशिम शहरात एकच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.