खामगावात भाजपच ठरला खरा धुरंधर : नगराध्यक्षपदासह 29 जागांवर मिळाविला एकहाती विजय

खामगाव :  खामगाव नगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून जनतेने भाजपाला स्पष्ट बहुमत दिला असून नगराध्यक्षपदी भाजपाच्या अपर्णा सागरफुंडकर ह्या प्रचंड बहुमताने निवडूण आल्या असून एकुण 35 जागांपैकी 29 जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 3 तर काँग्रेस पक्षाला 3 जागांवर विजय विळविता आला आहे.

खामगाव नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपाच्या उमेदवार अपर्णा सागर फुंडकर यांनी 25 हजार 654 मते घेत विक्रमी विजय मिळविला आहे. तर त्यांच्या प्रतिस्पधी राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार स्मिता किशोर भोसले ह्या 14 हजार 885 मते घेवून दुसऱ्या क्रमांक राहिल्या आहेत. तसेच अजित पवार गटाच्या चेतना संजय शर्मा यांना केवळ 8634 मते मिळाली असून अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. खामगाव नगर पालिकेची लढत ही एकंदरीत त्रिशंकू ठरली आहे. महायुतीमधील तीनही घटन पक्षांनी एकला चलोरेची घोषणा देत नगराध्यक्ष पदासह नगरसेव पदी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. याठिकाणी भाजपाच्या 29 जागा निवडणूक आल्या असून अजित पवार गटाला फक्त 3 जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेना शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडूण आला नसून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अश्विनी माळवंदे यांना फक्त 575 मते मिळाली असून या निवडणुकीत त्यांचे डिपॉजिटसुध्दा जप्त झाले आहे. विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »