dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Washim Breaking : तिसऱ्या फेरीअखेर अनिल केंदळे यांची आघाडी कायम

Washim Breaking : नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंदळे तिसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम ठेवून आहेत.

Washim Breaking

वाशिम : नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली आहे. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेले भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिल केंदळे तिसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम ठेवून आहेत.
तिसऱ्या फेरीअखेर अनिल केंदळे यांना ८,२४८ मते मिळाली असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार रेखा सुरेश मापारी यांना ६,४३४ मते मिळाली आहेत. यामुळे अनिल केंदळे यांनी १,८१४ मतांची आघाडी घेतली आहे.
दरम्यान, आतापर्यंत १ ते ६ प्रभागपर्यंत निकाल जाहीर झाले आहेत.

प्रभाग १ (अ) अनिल ताजने(भाजप)- विजयी
प्रभाग १(ब) अरुणा वाटाणे (भाजप)- विजयी
प्रभाग २(अ) करुणा कल्ले (शिवसेना उबाठा)- विजयी
प्रभाग २ (ब) कासाबाई लोणसूने(भाजप)-विजयी
प्रभाग ३ (अ) : राहुल तुपसांडे (भाजप) – विजयी
प्रभाग ३ (ब) : पूजा विनोद खंडेलवाल (भाजप) – विजयी
प्रभाग ४ (अ) : सोनूताई कन्हेया बढेल (शिवसेना उबाठा) – विजयी
प्रभाग ४ (ब) कुणाल हेडा (भाजप)- विजयी
प्रभाग ५ (अ) : गजानन दहात्रे पाटील (शिवसेना उबाठा) – विजयी
प्रभाग ५ (ब) : अंजली भानूप्रताप ठाकुर (भाजप) – विजयी
प्रभाग ६ (अ)- श्रद्धा इंगोले (शिवसेना उबाठा)- विजयी
प्रभाग ६ (ब)- पुरण बदलाणी (शिवसेना उबाठा)-(विजयी)

मतमोजणी केंद्र परिसरात निकालांच्या पार्श्वभूमीवर उत्सुकता वाढली असून, वाशिम शहरात समर्थकांकडून जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top