dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बालकावर लैंगिक अत्याचार, आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा; 60 हजाराचा दंड

मलकापूर :   एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस आजन्म कारावास व 60 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश 20 डिसेबर रोजी विद्यमान विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव मलकापूर यांनी दिला आहे.

मलकापूर :   एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस आजन्म कारावास व 60 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश 20 डिसेबर रोजी विद्यमान विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव मलकापूर यांनी दिला आहे.

या बाबत अधिक वृत्त असे की, मलकापूर येथील अल्पवयीन बालकाला नळगंगा नदीचे पात्रात नेऊन त्याचे वर लैंगिक अत्याचार व जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी केले. यावरून पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे आरोपी हमीद खान सिकंदर खान रा. मलकापूर याचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदरचे गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजीवनी विजय पुंडगे यांनी करून तपासाअंती दोषारोपपत्र विशेष सत्र न्यायालय मलकापूर येथे दाखल करण्यात आले होते. सदरचे प्रकरणात सुनावणी पुर्ण होऊन पिडीत मुलगा व आई वडील, डॉक्टर, तसेच इतर साक्षीदार व तपास अधिकारी असे एकुण 18 साक्षीदार सरकारपक्षा तर्फे शैलेश हरिहर जोशी विशेष सरकारी अभियोक्ता यांनी तपासले. त्यांचे पुराव्या नंतर आरोपी विरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने सदरचे प्रकरणात अंतिम युक्तिवाद होवून सरकार पक्षा तर्फे ॲड. शैलेश हरिहर जोशी विशेष सरकारी अभियोक्ता यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली तसेच 60 हजाराचा दंड ठोठावला असून दंडाची रक्कम वसूल झाल्यावर पीडित मुलास नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहे. सदरचे प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून संतोष भिकाजी कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक व पोहेकॉ. दिपक जाधव यांनी काम पाहिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top