वरठाण : भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत 27 वर्षीय दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात शनिवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास बनोटी ते सोयगाव रस्त्यावरील वरठाण गावाजवळ घडला. गोपाळ बाबुलाल ऊगले (27 वर्ष), रा. घोसला, ता. सोयगाव असे मयताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोसला येथे हॉटेल व्यवसाय करणारा गोपाळ ऊगले हा मित्र अमोल बोरसे याच्यासोबत दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एचके-०४६१) वर बनोटी येथे हॉटेलचे सामान खरेदी करण्यासाठी जात होता. त्यावेळी बनोटी येथून सोयगावकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच-१०-सीएन-७२२) ने वरठाण गावाजवळ दुचाकीला समोरा-समोर धडक दिली. अपघातानंतर गोपाळ उगले व अमोल बोरसे हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. अपघाताची माहिती मिळताच बनोटी दूरक्षेत्राचे ठाणे अंमलदार संदिप सुसर, राजु बरडे, नारायण खोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनम डव्हळे यांनी तपासून गोपाळ ऊगले याला मृत घोषित केले. तर अमोल बोरसे याच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद बनोटी दूरक्षेत्र पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.