बुलढाणा : ‘बुलेट’ या दुचाकीच्या सायलेंसरद्वारे फटाके फोडून कर्णकर्कश आवाज होतो. त्यामुळे, सर्व सामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा वाहतूक पोलिसांनी आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मागील तीन दिवसांत एकूण 38 जणांवर कारवाई करण्यात आली.

बुलढाणा जिल्ह्यात विशेषतः शहरी भागात काही टवाळखोर बुलेट चालकांनी आपल्या बुलेटला मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसविल्याचे निदर्शनास आले आहे. कारण नसताना सायलेंसरच्या माध्यमातून अनेकजण फटाके फोडतात. यामुळे, मोठा आवाज होवून रस्त्यावरील सर्व सामान्य नागरिकांना त्रास होतो. यासर्व प्रकाराला अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी वाहतूक शाखेला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईला सुरूवात करण्यात आली. 17 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत 38 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदरची मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहील. शिवाय, कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेंसर ठेवावे, त्यात मोडीफाय करन, मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेंसर बसवू नये, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
सायलेंसर बदलले आणि दंड आकारला
वाहतूक पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या ‘बुलेट’चे सायलेंसर बदलण्यात आले आहे. इतकेच नाही तर, अंदाजे 500 ते 1000 अशा रोख स्वरूपाचा दंड ठोठावण्यात आला आहे. आवाज करणारे बुलेट चालक पोलिसांच्या रडारवर आहेत.