भोकरदन नगरपालिकेचा ‘गड’ राखणार कोण ? दोन टप्प्यांतील मतदानानंतर उद्या फैसला

भोकरदन : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भोकरदन नगर परिषदेच्या निवडणुकीचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शहरातील एकूण १० प्रभागांतील २० नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी आज मतमोजणी होत असून भोकरदनचा ‘नवा कारभारी’ कोण ठरणार, याचा फैसला आज २१ डिसेंबर रोजी होत आहे. राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत मतदारांनी ‘विकास’ की ‘परिवर्तन’ यापैकी कोणाला पसंती दिली आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भोकरदन नगर परिषदेची ही निवडणूक दोन टप्प्यांत पार पडली, ज्यामुळे राजकीय समीकरणे अधिकच रंजक झाली आहेत. पहिला टप्पा २ डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी आणि एकूण २० पैकी १८ प्रभागांतील नगरसेवक पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दुसरा टप्पा न्यायालयीन प्रक्रियेमुळे लांबणीवर पडलेल्या उर्वरित दोन प्रभागांसाठी (प्रभाग १ अ आणि ९ ब) शनिवारी, २० डिसेंबर रोजी मतदान झाले. प्रभाग १ अ मध्ये पूजा अनिल आक्से (काँग्रेस), नीतू सुरेश कचके (शिवसेना उबाठा) आणि रेखा बिरसोणे (भाजप) यांच्यात तिरंगी लढत झाली. प्रभाग ९ ब मध्ये कदीर अब्दुल शब्बीर (राष्ट्रवादी शरद पवार गट), मुकेश चीने (भाजप), शेख फरदीन (काँग्रेस) आणि सिराज खान पठाण (अपक्ष) यांच्यात चुरस पाहायला मिळाली.

नगराध्यक्ष पदासाठी ‘हायव्होल्टेज’ लढत

यंदा नगराध्यक्ष पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने राजकीय घराण्यांतील महिलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रिंगणात एकूण ४ प्रमुख उमेदवार असून प्रामुख्याने खालील नावांची जोरदार चर्चा आहे. प्रियांका प्रतीक देशमुख (काँग्रेस) या जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या सूनबाई असून, त्‍यांच्या विकासकामांच्या जोरावर त्यांनी प्रचार केला आहे. आशाताई माळी (भाजप) भाजपने या निवडणुकीत मोठी ताकद लावली असून जुन्या अनुभवाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला आहे. शमीम बेग मिर्झा (राष्ट्रवादी शरद पवार गट) शहरातील सर्व समाजाशी एक जूट असलेल्या संपर्काचा त्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यांसारख्या उमेदवारांनीही प्रभावी प्रचार केल्यामुळे लढत चुरशीची झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »