dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

थंडीमुळे मतदानावर परिणाम, सकाळी कमी प्रतिसाद, चार तासांत. १६.४८ टक्के मतदान

वाशिम : नगराध्यक्ष आणि १६ प्रभागांतील ३२ सदस्यपदासाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. मात्र पहाटेपासून जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे मतदानावर स्पष्ट परिणाम दिसून आला. पहिल्या दोन तासांत अवघे साडेसहा टक्के मतदान झाले होते. थंडी, सकाळची वेळ आणि कामधंद्याची घाई यामुळे पुढील दोन तासांतही मतदानाचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढला नाही.

सकाळी ११.३० वाजेपर्यंत ७५ हजार ७० मतदारांपैकी केवळ १२ हजार ३७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, एकूण मतदानाची टक्केवारी १६.४८ इतकी नोंदवली गेली आहे. पहिल्या दोन तासांच्या तुलनेत पुढील दोन तासांत फक्त चार टक्क्यांनी वाढ झाली.

दरम्यान, दुपारी १२ वाजेनंतर मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसू लागल्या असून, दुपारनंतर मतदानाचा टक्का झपाट्याने वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिवाजी प्रभाग क्रमांक १० मधील शिवाजी विद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरू करण्यात आले.

एकूणच सकाळी थंडीचा फटका बसलेला असला, तरी दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढताना दिसत असून, मतदानाच्या टक्केवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top