वाशिमचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरकार कटिबद्ध – बावनकुळे

वाशिम: शहराचा नियोजित आणि सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णतः कटिबद्ध असून, नगरपरिषद स्थापन होताच पहिल्याच बैठकीत शहराचा विकास आराखडा (डीपी प्लान) मंजूर केला जाईल, असे ठाम आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिम येथे शुक्रवारी निवडणूक संदर्भात आयोजित जाहीर सभेत दिले.

वाशिम: शहराचा नियोजित आणि सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णतः कटिबद्ध असून, नगरपरिषद स्थापन होताच पहिल्याच बैठकीत शहराचा विकास आराखडा (डीपी प्लान) मंजूर केला जाईल, असे ठाम आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाशिम येथे शुक्रवारी निवडणूक संदर्भात आयोजित जाहीर सभेत दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाशिमचा डीपी प्लान मंजूर करून घेण्याची जबाबदारी आपण स्वतः घेणार असल्याचे स्पष्ट करत, नगरपरिषदेचे पदाधिकारी मंत्रालयात आले तर त्यांना थेट मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन विकास आराखड्याला मंजुरी मिळवून दिली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली जात असून, पुढील पाच वर्षांत वाशिम जिल्ह्यातील ५०० महिला बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. हिरकणी योजनेअंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार पाठीशी उभे राहील, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील ४५ लाख कृषी पंपांचे वीजबिल माफ करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आगामी काळात वीजदरवाढीचा फटका बसू नये म्हणून सूर्यघर योजनेंतर्गत वाशिममधील प्रत्येक घरावर सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

महसूल मंत्री म्हणून वाशिममधील नागरिकांच्या मालमत्तांना कायदेशीर दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, तुकडेबंदी कायद्यामुळे अडचणीत असलेली घरे कायदेशीर करण्यात येणार आहेत. दत्तनगर, सिव्हिल लाईन, नानानगर, विलासनगर, गोपीनगर, आंबेडकरनगर आदी भागांतील घरांना सातबारा व प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार असून, ड्रोन सर्व्हेद्वारे घरांचे नकाशे मोबाईलवर उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

विकासाची चारचाकी गाडी वाशिम नगरपालिकेतून निघाली असून, ती मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनतेची आहे, असे सांगत येणाऱ्या निवडणुकीत विकासाला साथ देण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »