dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शेतात गांजाची लागवड; 12.52 लाखांचा मुद्देमाल जप्त: मलकापूर पांग्रा शिवारात एलसीबीची कारवाई

बुलढाणा: मिशन परिवर्तन अंतर्गत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी अमलीपदार्थ तस्करी विरोधात कारवाईचे सत्र उगारले आहे. तीन दिवसांपूर्वीच झालेल्या कारवाईनंतर पुन्हा एलसीबीच्या पथकाने साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर पांग्रा शिवारातील एका शेतात धाड टाकून लाखो रुपयांचा गांजा जप्त केला. एलसीबीच्या पथकाने 18 डिसेंबरच्या रात्री ही कारवाई केली. 

  गांजा व तत्मस अंमलीपदार्थ साठवणूक, उत्पादन व विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख अंबूलकर यांना दिले होते. त्यानुसार, एक स्वतंत्र पथक तयार करत संशयित ठिकाणी धापा मारण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार साखरखेर्डा हद्दीतील मलकापूर पांग्रा येथील एका कपाशी – तुरीच्या शेतात धाड टाकली असता गांजाची साठवणूक केल्याचे दिसून आले. उभ्या पिकामध्ये गांजांच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. या प्रकरणी तातडीने कारवाई करीत आरोपीचा शोध घेण्यात आला. सुधाकर संपतराव गायकवाड (65 वर्ष रा. मलकापूर पांग्रा) असे त्याचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने शेतातील गांजाची ओलसर झाडे(11.40 लाख), सुकलेली झाडे(1.11 लाख) असा एकूण 12 लाख 52 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

कारवाई पथक.. 

आरोपीविरुद्ध साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड,  श्रेणिक लोढा, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस हेड कॉन्टेबल दिगंबर कपाटे, गजानन दराडे, वनिता शिंगणे, विजय वारुळे, दीपक वायळ, मंगेश सनगाळे, मनोज खरडे, समाधान टेकाळे यांच्या पथकाने पार पाडली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top