dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

छत्रपती संभाजीनगर मध्ये  जमिनीच्या वादातून वृध्दाचा खून

छत्रपती संभाजीनगर :  जमिनीच्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने हल्ला करुन एका 70 वर्षीय वृध्दाचा खून केला. ही घटना बुधवार, 17 डिसेंबर रोजी हर्सूल परिसरातील ओव्हर जटवाडा येथे घडली. सांडू पटेल (70 वर्ष), रा. ओव्हर जटवाडा, हर्सूल परिसर असे मयत वृध्दाचे नाव असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणातील दहा आरोपी फरार असून त्यांचा शोध हर्सूल पोलिस घेत आहेत.

मयत सांडू पटेल यांचा हल्लेखोरांसोबत जमिनीवरुन गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होता. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दहा ते बारा जणांनी सांडू पटेल यांच्यावर लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सांडू पटेल यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, गुन्हेशाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक राजपूत, गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सुनिता मिसाळ आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top