वैजापूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना वैजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सहारा हॉटेलजवळ बुधवार, 17 डिसेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. मन्साराम दशरथ आव्हाळे (७० वर्ष), रा.आघुर, ता. वैजापूर असे मृतक वृध्दाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्साराम आव्हाळे हे आपल्या दुचाकी क्रमांक (एमएच-५७-ए-४७५२) वर वैजापूर शहरातून गंगापूर रस्त्याकडे जात होते. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात त्यांच्या दुचाकीाल पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक क्रमांक (एमएच-०४-६०५५) ने जोराची धडक दिली. रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या मन्साराम आव्हाळे यांना वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मन्साराम आव्हाळे हे महावितरण कंपनीचे सेवावृत्त कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या अपघाताची नोंद वैजापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.