नायलॉन मांजाने चिरला दुचाकीस्वार युवकाचा गळा

संग्रामपूर:  तालुक्यातील वडगाव वाण परिसरात नायलॉन मांजाने पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला केला आहे. बंदी असतानाही खुलेआम वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे एका निष्पाप युवकाचा गळा अक्षरशः चिरला गेला असून तो युवक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.

  संग्रामपूर येथील शेख अनिस शेख गफार हा युवक आपले दैनंदिन काम आटोपून दुचाकीने घरी परतत असताना वडगाव वाण गावाजवळ अचानक रस्त्यात लटकलेल्या नायलॉन मांजाने त्याच्या गळ्यावर घाव घातला. क्षणात रक्तबंबाळ झालेल्या युवकाचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो गंभीर जखमी झाला. तात्काळ स्थानिकांनी धाव घेतली आणि युवकाला उपचारासाठी अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तो अतिदक्षता विभागात असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. बंदी असतानाही नायलॉन मांजाची खुलेआम विक्री सुरूच आहे. प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची डोळेझाक किती जीव घेणार? याआधीही अनेकांचे गळे कापले गेले, अपघात झाले, तरी कारवाई फक्त कागदावरच एखादा मृत्यू झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? नायलॉन मांजाविरोधात तातडीची कठोर कारवाई झाली नाही, तर असे जीवघेणे प्रसंग थांबणार नाहीत, हेच या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »