मलकापूर : तालुक्यातील ग्राम विवरा येथे 4 महिन्यापूर्वी झालेल्या अतीवृष्टीमुळे प्रशासनाकडून अद्यापपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे तीन दिवसात नुकसान भरपाई द्या अन्यथा तहसील कार्यालयात पाल ठोकून झिंगे-बोबींल भुजो आंदोलन करून असा इशारा शिवसेना उबाठाच्या वतीने गावकऱ्यांकडून तसीलदार यांना देण्यात आले आहे.

मलकापूर : तालुक्यातील ग्राम विवरा येथे 4 महिन्यापूर्वी झालेल्या अतीवृष्टीमुळे प्रशासनाकडून अद्यापपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे तीन दिवसात नुकसान भरपाई द्या अन्यथा तहसील कार्यालयात पाल ठोकून झिंगे-बोबींल भुजो आंदोलन करून असा इशारा शिवसेना उबाठाच्या वतीने गावकऱ्यांकडून तसीलदार यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, चार महिन्या अगोदर 16 सप्टेंबर रोजी ढगफुटी होऊन अतिवृष्टी झाली. या अतीवृष्टीने शेतातील उभी पिके वाहून शेतजमीनी खरडून गेल्या, रहिवासी ग्रामस्थांचे घरांत पाणी गेल्याने अन्नधान्यासह जिवनावश्यक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्याकरीता पालकमंत्री ना.संजय सावकारे, मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय महसूल अधिकारी संतोष शिंदे, तत्कालीन तहसीलदार राहुल तायडे, तलाठी, मंडळ अधिकारी आदींनी भेटी दिल्या. नुकसानग्रस्त शेती, घरांची पाहणी करून पंचनामे करण्यात आले. पंचनामे होऊन तब्बल चार महिने उलटले, मात्र शासनाने अनुदान अद्यापही ग्रामस्थांच्या खात्यात जमा केले नाही. याबाबतची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहर प्रमुख हरिदास गणबास यांना सांगितल्याने 15 डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांना निवेदन देऊन तीन दिवसात विवरा येथील अतिवृष्टी धारकांच्या खात्यात जमा करा अन्यथा शुक्रवार 19 डिसेंबर रोजी तहसील कार्यालय आवारात पाल ठोकून झिंगा-बोंबील भुजो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहरप्रमुख हरिदास गणबास, मंगेश सातव, इम्रान लकी, सिताराम तायडे, दामा तायडे, समाधान तायडे, संघपाल तायडे, विलास तायडे, रघुनाथ सोनोने, सुखदेव वाळसे, मुरलीधर हिरळकर, त्र्यंबक तायडे, रविकर तायडे, भागवत कडू, अरुण सोनोने, आनंदा तायडे, दीपक तायडे, समाधान सोनोने, योगेश भिल, जंगलू सोनवणे, शे.शब्बीर शे.बुढन, सै.रहीम सै.करीम, सै.फरहान सै.यासीन, सै.तौफीक सै.रफीक सह विवरा ग्रामस्थ व शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
