dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

ग्रामसेवक गैरहजेरीविरोधात  ग्रामस्थांचे आंदोलन 

पिंपळगाव सराई : रायपूर ग्रामपंचायतीत नियमित ग्रामसेवक गेल्या महिनाभरापासून हजर नसल्याने पंचायतीचे सर्व प्रशासकीय व विकासात्मक काम ठप्प झाले आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला असून, आज सकाळी शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्र येऊन जोरदार आंदोलन केले.

   गेल्या महिन्याभरापासून रायपूर गावातील नियमित ग्रामसेवक अनुपस्थित आहेत. त्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणी, दाखले, करआकारणी, घरकुल, जलपुरवठा, शौचालय योजना आणि विविध विकासकामांच्या फाईली प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना वारंवार पंचायतीत फेऱ्या माराव्या लागत असूनही काम होत नसल्याने नाराजी वाढली आहे.ग्रामस्थांनी सांगितले की, प्रशासनाकडून तात्पुरते ग्रामसेवक पाठवले जात असले तरी ते प्रत्यक्ष गावात राहत नाहीत. त्यामुळे “तात्पुरता ग्रामसेवक नको, गणेश पाहेघन यांनाच कायम करा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, आंदोलनाच्या वेळी विस्तार अधिकारी अरविंद टेकाळे आणि गवते यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून सांगितले की, समस्येवर उपाययोजना सुरू असून बीडीओ कार्यालयाशी उच्चस्तरीय पत्रव्यवहार सुरू आहे.ग्रामस्थांनी चेतावणी दिली की, जर अल्पावधीत नियमित ग्रामसेवक नेमण्यात आला नाही, तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प झाल्यामुळे गावातील अनेक सेवा विस्कळीत झाल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top