dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समाज संत सन्मुख होण्याची गरज : ॲड.यशोधन महाराज साखरे 

जालना :  संत हे समाज सन्मुख आहेतच, आता समाज सन्मुख होण्याची गरज आळंदी देवाची येथील तत्त्वज्ञ,अभ्यासक हभप ॲड. यशोधन महाराज साखरे यांनी येथे केले. 

जालना :  संत हे समाज सन्मुख आहेतच, आता समाज सन्मुख होण्याची गरज आळंदी देवाची येथील तत्त्वज्ञ,अभ्यासक हभप ॲड. यशोधन महाराज साखरे यांनी येथे केले. 

     जालना शहरातील जेईएस महाविद्यालयात आयोजित वारकरी संत साहित्य संमेलनात  प्रकट मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. प्रमोद कुमावत व डॉ.ऋषीबाबा शिंदे यांनी ही मुलाखत घेतली. 

          मानसिक स्वास्थ्य  आणि संत विचार यावर विचारलेल्या प्रश्नांची ॲड. साखरेचे महाराज यांनी समर्पक उत्तरे दिली. ते म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात ताणतणाव वाढला आहे. ताणतणाव असलेला प्रत्येक जण हा मनशांतीसाठीही धडपड करीत आहे, मात्र त्याला सुख-  समाधान लाभत  नाही. माणसाला सुख- समाधान व आनंद मिळवण्यासाठी अध्यात्म हाच एकमेव पर्याय आहे. आपली  संस्कृती, संत साहित्य, ग्रंथ हे मानवी मन स्थिर करण्यासाठी निर्माण झाले आहेत. मानवी मन हे पंचमहाभूतांपासून तयार झाले आहे. मन हे खूप चपळ आहे त्याला स्थिर करण्याची ताकद केवळ  अध्यात्मामध्येच  असल्याचे त्यांनी सांगितले. 

     आज प्रत्येक जण  मानसिक तणावाखाली जगत आहेत. मानसिक स्वास्थ्यही बिघडत चालले आहे. तरूणाई व्यसनाधीन झाली आहे. येणारा काळ हा भयावह आहे. यासाठी अध्यात्म हाच एकमेव पर्याय आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी समाजाने संत सन्मुख होण्याची गरज आहे. सदगुरू हे आनंदाचे सागर आहेत. या आनंदाची अभिव्यक्ती होणे गरजेचे आहे. मानसिक समाधानासाठी प्रत्येकाने भगवतांचे नामचिंतन करावे, निष्पाप होऊन कार्य करावे, असा उपदेशही ॲड. साखरे महाराज यांनी आपल्या मुलाखतीद्वारे केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top