तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वैकुंठ गमन :संपूर्ण भक्तवर्ग शोकसागरात;  शेकडो भक्त वरोडीत दाखल

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वैकुंठ गमन झाले. शनिवारी रात्री ९ :३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

साखरखेर्डा : येथून जवळच असलेल्या तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या ९० व्या वर्षी वैकुंठ गमन झाले. शनिवारी रात्री ९ :३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचा जन्मोत्सव नुकताच २८ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला होता. लाखो भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला होता. तब्बल ३८ वर्षांपासून वरोडी येथे त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येतो. त्यांच्या कृपा आशिर्वादाचा प्रसाद अनेकांना मिळाला. २८ नोव्हेंबर ला जन्मोत्सव सोहळा झाल्यानंतर अचानक परमहंस श्री तेजस्वी महाराज यांची तब्येत बिघडली होती. नातू डॉ . गुंजकर हे २४ तास महाराज श्रींच्या संपर्कात होते. त्यांनी सतत उपचार सुरुच ठेवले. परंतू त्यांच्या अवयव काम करण्यास सहकार्य करत नसल्याने महाराज श्रींची तब्येत खालावत चालली होती. ३० नोव्हेंबर पासून तब्येत खालावल्याने भक्तांचा महासागर वरोडीत दाखल होत  होता. हरिनामाचा गजर सतत सुरू होता. महाराजांना दिर्घ आयुष्य लाभावे म्हणून भजन, कीर्तन, प्रवचन , जागर सतत सुरू होता. परंतू १३ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता आपला देह ठेवला. यावेळी त्यांचे बंधू माजी सरपंच जनार्दन गुंजकर यासह भाऊ, दोन बहिणी, संस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. त्यांच्या वैकुंठ गमनाची वार्ता साखरखेर्डा , मेहकर , शेंदुर्जन भागात पसरताच हजारो भाविकांनी वरोडीकडे धाव घेतली. यावेळी भाविकांचे डोळे पाणावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »