dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाणा जिल्ह्यात 47 केंद्रांवर नवोदय पूर्व परीक्षा यशस्वी: शेगावात तीन परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्तात परीक्षा

शेगाव :  जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात येणारी पूर्व परीक्षा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्रांवर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. जिल्ह्यातील शेगाव शहरात बुरुंगले महाविद्यालय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय आणि म्युनिसिपल हायस्कूल अशा तीन केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जवाहर नवोदय विद्यालय शेगावच्या वतीने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. याशिवाय भरारी पथकांनी तसेच आर आर कासार प्रिन्सिपल जवाहर नवोदय विद्यालय शेगाव यांनी विविध केंद्रांना भेटी देत परीक्षा प्रक्रियेवर लक्ष ठेवले. जवाहर नवोदय विद्यालय, बुलढाणा अंतर्गत एकूण 14,336 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13,624 विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहिले असून उपस्थितीचा टक्का 95.03 इतका नोंदविण्यात आला. 712 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. परीक्षेस उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 6,710 मुले (94.48 टक्के) तर 6,914 मुली (95.58 टक्के) सहभागी झाल्या. एकूण शालेय उपस्थितीचा टक्का 95.03 इतका राहिला. परीक्षा सुरळीत पार पडल्याने पालक, विद्यार्थी आणि प्रशासनाने समाधान व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top