dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जळगाव जामोद, शेगाव आणि खामगावातील प्रलंबित प्रभागात 20 ला मतदान: खामगावात 17 हजार मतदारांच्या हाताला पुन्हा लागणार शाई

खामगाव :   न्यालयामध्ये अपिलीत गेलेल्या खामगाव, जळगाव जामोद आणि शेगाव नगर पालिकेतील प्रलंबित प्रभागांमध्ये पुन्हा नव्याने मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. खामगाव नगर पालिकेतील चार प्रभागातील 10 उमेदवारांसाठी 17 हजार मतदारांना पुन्हा मतदान करण्याची संधी मिळाली असून त्यांच्या हाताला आता दुसऱ्यांदा शाई लागणार आहे. या प्रलंबित प्रभागामध्ये प्रचाराला सुरूवात झाली असून उमेदवारांनी पुन्हा एकदा घरोघरी भेटी देवून प्रचाराला सुरूवात केली आहे.

खामगाव :   न्यालयामध्ये अपिलीत गेलेल्या खामगाव, जळगाव जामोद आणि शेगाव नगर पालिकेतील प्रलंबित प्रभागांमध्ये पुन्हा नव्याने मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. खामगाव नगर पालिकेतील चार प्रभागातील 10 उमेदवारांसाठी 17 हजार मतदारांना पुन्हा मतदान करण्याची संधी मिळाली असून त्यांच्या हाताला आता दुसऱ्यांदा शाई लागणार आहे. या प्रलंबित प्रभागामध्ये प्रचाराला सुरूवात झाली असून उमेदवारांनी पुन्हा एकदा घरोघरी भेटी देवून प्रचाराला सुरूवात केली आहे.

खामगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये 2 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह 35 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बहुतेक प्रभागांत मतदान पार पडले असले तरी प्रभाग क्रमांक 5 अ, 7 अ, 9 अ आणि 16 ब या चार प्रभागांतील मतदानाला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. त्यामुळे आता या प्रभागांचे निकालच नगरपालिका सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट करणारे ठरणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये एकुण 4507 मतदार आहेत. तसेच प्रभाग 7 मध्ये 3840, प्रभाग 9 मध्ये 4315, प्रभाग 16 मध्ये 4485 मतदार असून यापैकी आता किती मतदार पुन्हा होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रभागातील निवडणुकांसाठी शहरातील विविध पक्ष, पॅनल्स, गट आणि प्रभावी व्यक्तींचे लक्ष आता पूर्णपणे याच प्रभागांकडे वळले आहे. स्थगिती जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे आधी लावलेले होडिंग्ज शहरातून हटवण्यात आले होते. मात्र नव्या तारखा जाहीर होताच चारही प्रभागांत पुन्हा नवी पोस्टर्स झळकू लागली आहेत. उमेदवारांच्या टीमकडून बदललेल्या तारखांसह नवीन होर्डिंग्जची उभारणी सुरू झाली आहे. 11 डिसेंबरपासून गल्लीबोळांत प्रचाराचे भोंगे पुन्हा ऐकू येणार असून मतदारांपर्यंत पोहचण्याची धडपड जोरात सुरू होणार आहे. पूर्वी जातनिहाय, बूथनिहाय आणि घराघरातील संपर्क 

वेळ मिळाल्याने प्रचार अधिक आक्रमक करतील, याचे संकेत त्यांच्या हालचालींवरून मिळत आहेत.

या उमेदवारांसाठी होणार मतदान

खामगावातील प्रभाग 5-अ मध्ये काँग्रेसच्या शीला गजानन जांभे, भाजपच्या निलीमा प्रसाद डोरले आणि राष्ट्रवादी अ.प. गटाच्या विद्या राम बुरंगी तर प्रभाग क्रमांक 7-अ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गायत्री निलेश तासतोडे, काँग्रेसच्या शारदा विनोद माळवंदे, प्रभाग क्रमांक 9-अ मध्ये काँग्रेसच्या अहेमद मेहेरूनिसा रियाज, गायत्री सत्यनारायण थानवी तर प्रभाग क्रमांक 16-अ मध्ये भाजपच्या रेखा गणेश जाधव, शिंदेसेनेच्या पुष्पा मोहन ठोंबरे, काँग्रेसच्या लक्ष्मी घनश्याम सावरकर निवडणूक रिंगणात असून यांच्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top