dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बोगस जात प्रमाणपत्र प्रकरण; बुलढाण्यातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप!

बुलढाणा: बोगस जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याप्रकरणी  बुलढाण्याचे समाज कल्याण विभागातील तत्कालीन  संशोधन अधिकारी अनिता राठोड आणि  वृषाली शिंदे यांच्या निलंबनाची घोषणा विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी काल केली होती.

बुलढाणा: बोगस जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याप्रकरणी  बुलढाण्याचे समाज कल्याण विभागातील तत्कालीन  संशोधन अधिकारी अनिता राठोड आणि  वृषाली शिंदे यांच्या निलंबनाची घोषणा विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी काल केली होती. काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी हे प्रकरण सभागृहात मांडले होते. याच पार्श्वभूमीवर,  आता बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी बुलढाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारांचे आरोप करण्यात आले.  आरक्षण बचाव समितीचे राजेश राठोड यांनी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन अधिकाऱ्यांनी लाखो रुपयांचा अपहार करत चुकीचे प्रमाणपत्र निर्गमित केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, या प्रकरणाशी संबंधित राज्यातील विविध ठिकाणांचा संदर्भ देत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. दोशींवर तातडीने कारवाई व्हावी, अन्यथा  आरक्षण बचाव समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. राठोड यांनी केलेल्या आरोपांवर बुलढाण्यातील समाज कल्याण विभागात कार्यरत असलेल्या संशोधन अधिकारी मनोज मेरत यांनी स्पष्टीकरण देऊन आरोपांची खंडन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top